|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जनजागृतीसाठी 150 गावातून फिरणार एलईडी चित्ररथ

जनजागृतीसाठी 150 गावातून फिरणार एलईडी चित्ररथ 

जिह्यात प्रभावी जनजागृतीसाठी 150 गावातून फिरणार एलईडी चित्ररथ

प्रतिनिधी/ गोडोली

राज्यभरात अधिक प्रभावीपणे पाणी व स्वच्छता जनजागृती करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सातारा जिह्यातही जिल्हा परिषदेने 11 तालुक्यातील 14 गावात स्वच्छ भारत प्रचार प्रसिद्धी रथ चित्रफीतीव्दारे जनजागृती करण्याचा  सोमवारी दि. 11 रोजी प्रारंभ झाला आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, सभापती शिवाजी सर्वगौड, वनिता गोरे, राजेश पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे, जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील, सुरेंद्र गुदगे, अर्चना देशमुख, निवास थोरात, उदयसिंह पाटील, शिवाजीराव महाडिक, उप.मुख्य कार्यकारी अधिकारी सायमोते, रविंद्र सोनवणे, अजय राऊत, गणेश चव्हाण, राजेश भोसले, राजेश इंगळे आदी उपस्थित होते.

जिह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी 14 अशा 150 गावामध्ये हा एल.ई.डी.रथ फिरणार आहे. यामुळे पाणी व स्वच्छतेबाबत प्रभावी जनजागृती होणार आहे. त्याबरोबर त्या त्या गावातील शाळांना भेटी देऊन मुलांना स्वच्छतेच्या फिल्म दाखवून त्यांच्या मनातील शंका समाधान करण्यात येणार आहे.

जिह्यातील शाश्वत स्वच्छतेसाठी महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम हाती घेतला असून शौचालयाचा नियमित वापर, पिण्याच्या पाण्याबाबत घेण्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व विषयक विविध लघुपटातून जनजागृती जिह्याभर या माध्यमातून केली जाणार आहे.

Related posts: