|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहरातील शाळांमध्ये हॉर्न विसरा अभियान

शहरातील शाळांमध्ये हॉर्न विसरा अभियान 

प्रतिनिधी/ सातारा

दिवसेंदिवस रस्ते अपघातांमध्ये मोठय़ा प्रमाणावर व्यक्ती मृत्यूमुखी पडत आहेत. त्याचप्रमाणे वाढत्या वाहनसंख्येमुळे व हॉर्नच्या आवाजाने ध्वनी प्रदुषणाच्या पातळीत वाढ होत आहे. रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच ध्वनी प्रदुषणाच्या पातळीत घट करण्यासाठी साताऱयातल्या सर्वच शाळांमध्ये एमएच 11 आता हॉर्न विसरा हे अभियान राबवण्यात येत आहे. दस्तुरखुद्द उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत हे प्रबोधन करुन त्यांना शपथ देत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या तसेच राष्ट्रीय हरित लवादांनी वेळोवेळी दिलेले निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांनी सुचित केल्याप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आर.टी.ओ विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग व विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिह्यातील सर्व नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा आणि वाहनांमधून होणाऱया ध्वनी प्रदुषणाबाबत जनजागृती करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने अभियान राबवण्यात येत आहे. संपूर्ण देशात दरवर्षी सुमारे दीड लाख व्यक्ती रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात. जवळपास पाच लाख व्यक्ती जखमी होतात. महाराष्ट्रात तेरा हजार व्यक्ती मृत्यूमुखी पडतात. चाळीस हजार व्यक्ती जखमी होतात. सुमारे 90 टक्के अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात. हॉर्न न वाजवता वाहन चालवल्यास वेगावर नियंत्रण राहते. वाहतूक सुरक्षित होते, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले. तसेच त्यांनी शपथही दिली.

Related posts: