|Thursday, December 12, 2019
You are here: Home » leadingnews » बंद दाराआडची चर्चा शाहांनी मोदींना का सांगितली नाही?

बंद दाराआडची चर्चा शाहांनी मोदींना का सांगितली नाही? 

संजय राऊत यांचा अमित शाहांवर निशाणा

ऑनलाइन टीम / मुंबई : 

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे वक्तव्य नैतिकतेला धरुन नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. बंद दाराआड जी चर्चा झाली ती पंतप्रधानांपर्यंत नेली असती तर इतकी वेळ आली नसती. ही बंद खोली सामान्य खोली नव्हती. ज्या खोलीत बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आशिर्वाद दिला. पंतप्रधान मोदींनी इथे आशिर्वाद घेतला. इथे अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आमच्यासाठी हे मंदीर आहे. या मंदीरात ही चर्चा झाली. संपूर्ण देशाची श्रद्धा या मंदीराशी जोडली गेली आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन आम्ही कधी खोट बोलणार नाही. आम्ही खोटय़ाचे राजकारण करणार नाही.

ही चर्चा बंद खोलीत नव्हे तर मंदीरात झाली. या मंदीराला, चर्चेला तुम्ही नाकारत असाल तर तुमच्या तुम्हाला शुभेच्छा असल्याचे राऊत म्हणाले.

जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून करत होतो, तेव्हा शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही, असं शाहा म्हणाले. आम्ही पंतप्रधनांचा आदर करतो आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्हाला ते करायचं नव्हतं. भाजपाला जरी त्यांचा आदर नसला तरी आम्ही त्यांचा आदर करतो. म्हणून आम्ही त्यावेळी त्यावर काही आक्षेप घेतला नाही.

आम्ही व्यापारी नाही. आमच्या महाराष्ट्राची देण्याची वृत्ती आहे. कोणाचे ओरबडून खाण्याची वृत्ती नसल्याचे ते म्हणाले. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचा आम्ही नेहमीच सन्मान ठेवला. पण दुसरी बाजू काय आहे हे सांगणे आमचे कर्तव्य आहे.

 

 

 

Related posts: