|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » सेवेचा खरा अर्थ जाणणाऱयांचा सन्मान व्हावा

सेवेचा खरा अर्थ जाणणाऱयांचा सन्मान व्हावा 

पुणे / प्रतिनिधी :  

राजकारणी लोक प्रसिद्धीसाठी काम करतात मात्र, सामाजिक कार्यकर्ते सिद्धीकरिता काम करतात़  सेवाभाव नसल्यामुळे शिक्षकांमधील ‘गुरूजी’ हरवले आहेत. राजकारणात ‘सेवेची संधी द्या’, असे म्हणून कमिटीचा सदस्य, अध्यक्ष, पदाधिकारी होण्याची ‘संधी’ मागितली जाते़ पण सेवेचा खरा अर्थ जाणणाऱयांचा समाजाने सन्मान केला पाहिजे़,असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.

अकरा मारुती चौक गणेशोत्सव मंडळ, सत्येश्वर मित्र मंडळ, राष्ट्रीय कला अकादमी न्यास आणि कै. विनायक महादेव रेणुसे यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता सेवा पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते़ दुर्ग भ्रमणकार आनंद पाळंदे, ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, नंदु घाटे, सुनील खाटपे, नगरसेवक हेमंत रासने, गायत्री खडके, भोला वांजळे,अ‍ॅड.  नितीन झंजाड मंडळाचे अध्यक्ष रवी मोरे, विनायक घाटे, अभिषेक थिटे, संकेत जाधव, शुभम कुलट, सिध्देश घाटे आदी यावेळी उपस्थित होते़ 

यंदाचा कृतज्ञता सेवा पुरस्कार पुणे ग्रामीण जलसंधारण विभाग प्रमुख सुनिता गायकवाड व सामाजिक कार्यकर्त्या अश्वनी गोरे यांना प्रदान करण्यात आला. आयर्नमॅन प्रसाद शिंदे, किक बॉक्सर चैतन्य येनपुरे, जिम्नॅस्ट आर्या बेरी, रायफल शूटर संग्राम बिडलान, वैद्यकीय अधीक्षक किरण कांबळे, अर्जुन राठोड, चाईल्ड केअर कोआॅर्डिनेटर मनिषा जाधव, शवविच्छेदन तंत्रज्ञ विठ्ठल वाघमारे, मनिषा पांढरे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला़
उल्हास पवार म्हणाले, समाजात सेवेची कल्पना रूजविणे हा संस्कृतीचा ठेवा आहे़ कृतज्ञता, सेवाभाव या शब्दांना समाजात आज स्थान राहिले नाही़ अशावेळी समाजात चांगले काम करणाºयांना शोधून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आवश्यक आहे़
आनंद पाळंदे म्हणाले, समाजामध्ये प्रकाश देऊन वंचितांपर्यंत विकास पोहचविणारे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते म्हणजे प्रकाशपर्वच आहेत. 
सुनीता गायकवाड म्हणाल्या, ”भोर, वेल्हा तालुक्यात पिण्यासाठी पाणी मिळत नाही़ एक हंड्यासाठी डोंगरावर राहणाºया २४ ठिकाणी बायका डोक्यावर हंडा घेउन तीन किलोमीटर पायपीट करतात़ लाखो रूपयांचे श्रमदान महादेव कोळी समाजाने करून त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे़ भाटघर, पानशेत धरणात समोर पाणी दिसते पण, घरात प्यायला पाणी नसते़ त्याठिकाणी आम्ही काम करत आहोत़ त्यामुळे आम्ही पाण्याचे महत्त्व जाणले असून, शहरातील नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा प्रयत्न करावा़ आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले़ 

Related posts: