|Friday, December 6, 2019
You are here: Home » leadingnews » राफेलविरोधातील सर्व याचिका कोर्टानं पुन्हा फेटाळल्या

राफेलविरोधातील सर्व याचिका कोर्टानं पुन्हा फेटाळल्या 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

राफेलविरोधात पुनर्विचार याचिकेववर सुप्रिम कोर्टाने आज मोठा निर्णय दिला आहे. या निकालामध्ये राफेलविरोधातील सर्व याचिका कोर्टानं पुन्हा फेटाळल्या आहेत. तसेच चौकशीची ही गरज नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठाने राफेलवरील याचिंकावर आज सुनावणी झाली.

दरम्यान राफेल प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मागितलेली माफी देखील कोर्टाने मान्य केली आहे. तसंच राहुल गांधी यांचं पंतप्रधानांविरोधत केलेली ‘चौकीदार चोर है’ हे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण होतं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

 

Related posts: