|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » Top News » गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचं निधन

गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचं निधन 

ऑनलाइन टीम / पटणा : 

गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांनी पाटणाच्या पीएमसीएच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 77 वर्षांचे होते. वशिष्ठ दीर्घकाळापासून सिजोप्रेनिया आजाराने ग्रस्त होते.

वशिष्ठ नारायण यांनी शास्त्रज्ञ आइन्स्टाइनच्या सापेक्षताच्या सिद्धांताला आव्हान दिले होते. त्यांचा जन्म 2 एप्रिल 1942 रोजी बिहार येथील भोजपूर जिल्ह्रातील बसंतपूर या गावात झाला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

 

Related posts: