|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कारांचे रेणू गावस्कर यांच्या हस्ते वितरण

राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कारांचे रेणू गावस्कर यांच्या हस्ते वितरण 

पुणे / प्रतिनिधी : 

अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कारांचे वितरण आज  14 नोव्हे रोजी बालदिनी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका रेणू गावस्कर यांच्या हस्ते बाल गन्धर्व रंग मंदिरात संपन्न झाले. मनपा शाळेचे विदयार्थी व अनेक मान्यवरांच्या उपस्थीतीत हा देखणा कार्यक्रम रंगला यावेळी संस्थेच्या अध्यक्ष संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू, सुनील महाजन ,माधुरी सहरबुद्धे शिरीष चिटणीस आदी मंचावर उपस्थित होते गणेश घुले, ल सी जाधव, एकनाथ आव्हाड,अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, सूर्यकांत सराफ, उमेश घेवरीकर यांचा संस्थेच्या वतीने सन्मानपत्र रोख रक्कम पुरस्कारार्थ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पुरस्करार्थीच्या वतीने मनोगत व्यक्त करताना अच्युत गोडबोले म्हणाले, बाल मनाचे संगोपन करणाऱ्या बाल साहित्याचे स्थान साहित्य विश्वात अत्यंत महत्वाचे असून संस्था या क्षेत्रात करत असलेले कार्य म्हणूनच मोलाचे आहे.

रेणू गावस्कर अध्यक्षीय मनोगतात म्हणाल्या, ज्यांना आई वडील नाहीत त्यांची आई समाजाने व्हावे आणि कुणालाही आपण अनाथ आहोत असे वाटू नये ही मोठ्यांची जबाबदारी आहे,मुलांसाठी पुस्तक म्हणजे आईची माया वाटणे हे बाल साहित्याचे खरे यश मानावे. सूत्र संचालन यांनी तर प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले

Related posts: