|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’चा ‘ग्रँड फिनाले’ रंगणार सोमवारी

‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’चा ‘ग्रँड फिनाले’ रंगणार सोमवारी 

पुणे / प्रतिनिधी :

व्हाईट डिव्हाईन इव्हेंट्स आणि डॉक्टर ऑन कॉल बाय पिनॅकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र 2019’ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी (ग्रॅन्ड फिनाले) येत्या सोमवारी (दि. 18 नोव्हेंबर) सायंकाळी 6.00 वाजता पुणे-बँगलोर हायवेवरील नवले लॉन्स येथे रंगणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात ‘डॉक्टर ऑन कॉल’ या मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती संयोजिका व्हाईट डिव्हाईनच्या संस्थापक डॉ. पल्लवी प्रसाद आणि ‘डॉक्टर ऑन कॉल’चे प्रकल्प अधिकारी राजेश पिल्लेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. पल्लवी प्रसाद म्हणाल्या, “या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, यंदाच्या स्पर्धेची संकल्पना ‘डिप्रेशन अवेअरनेस’ अशी आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत ऑडिशन्स आणि प्राथमिक फेर्‍या घेतल्यानंतर एकूण 23 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. ‘रिप्रेझेंट द महाराष्ट्र’, ‘डिप्रेशन अवेअरनेस’, स्पोर्ट्स, जनरल नॉलेज, कॅटवॉक, इंट्रोडक्शन, प्रश्नोत्तरे अशा एकूण सात फेर्‍या होणार असून, त्यातून अंतिम निकाल जाहीर होणार आहे. जवळपास 700 प्रेक्षक या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, अभिनेत्री शिवानी बावकर, मेघा धाडे, श्वेता मांडे, ग्रुमर चाहत दलाल, उद्योजिका संगीता ललवानी, दिग्दर्शक केदार गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संतोष चाकणकर आदी उपस्थित राहणार आहेत.”

राजेश पिल्लेवार म्हणाले, “या स्पर्धेची थीम ‘डिप्रेशन अवेअरनेस’ ही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे ‘डॉक्टर ऑन कॉल’ या स्पर्धेशी जोडले गेले आणि याच कार्यक्रमात ‘डॉक्टर ऑन कॉल’ या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पिनॅकल कॉर्पोरेशन प्रा. लि. चे संचालक हरिश माहेश्वरी आणि विठ्ठल काकडे यांच्या संकल्पनेतून हे अ‍ॅप विकसित झाले असून, सर्वसमान्यांपर्यंत वैद्यकीय सेवा माफक दरात व सुलभ पद्धतीने उपचार मिळावेत, याकरिता डॉक्टर ऑन कॉल हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. ताणतणावाच्या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्पर्धेचे आयोजन करण्यात आमचा सहभाग आहे, याचा आनंद वाटतो. या स्पर्धेत स्पर्धकांनी तणावमुक्तीसाठी दिलेले उपाय प्रत्यक्षात आणता येतील.’

Related posts: