|Thursday, December 12, 2019
You are here: Home » उद्योग » फेसबुकने बंद केली 5.4 अब्ज बनावट खाती

फेसबुकने बंद केली 5.4 अब्ज बनावट खाती 

वृत्तसंस्था /लंडन :

फेसबुककडून यावषी तब्बल 5.4 अब्ज बनावट खाती बंद करण्यात आली आहेत. मात्र, तरीही अद्याप लाखो बनावट खाती कार्यरत असण्याची शक्यता फेसबूकने व्यक्त केली आहे. तर 2018 मध्ये 3.3 अब्ज बनावट खाती बंद केली होती, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

महिनाभरात नियमित वापरकर्त्यांची 2.5 अब्ज बनावट खाती होती. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे अशी बनावट खाती उघडताच ती शोधून बंद करण्यात आली. यामुळे अमेरिकेत होणारी निवडणूक आणि जनगणनेच्या काळातील फेसबुक पुढील आव्हान वाढले आहे. या प्रकाराकडे आम्ही किती गांभीर्याने पाहतो, हे ज्या मोठय़ा संख्येने आम्ही बनावट खाती बंद केली त्यावरून स्पष्ट होते. मोठय़ा संख्येने बनावट खाती बंद केली असली तरी याचा अर्थ त्यात फार हानिकारक मजकूर होता, असे नव्हे. तर आम्ही बनावट खाती शोधण्यासाठी अधिक परिश्रम घेत आहोत, असे फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले.

 

Related posts: