|Thursday, December 5, 2019
You are here: Home » उद्योग » दहा हजार क्षमतेची बॅटरी असणारा स्मार्टफोन सादर

दहा हजार क्षमतेची बॅटरी असणारा स्मार्टफोन सादर 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

चीनी स्मार्टफोन कंपनी हायसेंसने आपला नवीन स्मार्टफोन किंगकाँग 6 ला चीनमध्ये सादर केले आहे. या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात तब्बल 10,010 एमएएचची बॅटरी देण्यात आलेली आहे. हा फोन दिसायला सर्वसाधारण फोनप्रमाणेच आहे, मात्र यामध्ये लावण्यात आलेल्या एका खास एक्सेसरीजद्वारे फोनची बॅटरी वाढवण्यात आलेली आहे.

किंगकाँग 6 मध्ये 5510 एमएएचची इन-बिल्ट बॅटरी आहे. मात्र सोबतच 4500 एमएएचचा बीस्पोक बॅटरी केस देखील उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे फोनमध्ये एकूण 10010 एमएएचची बॅटरी क्षमता मिळते. फोनच्या रिअर पॅनेलवर कनेक्टर्स देण्यात आलेले आहेत. ज्याच्या मदतीने फोनमध्ये बीस्पोक बॅटरी केसला फीट करण्यात येते. त्यामुळे वापरकर्ते गरजेनुसार याचा वापर करू शकतात.

त्याचबरोबर या फोनमध्ये 3 रिअर कॅमेरे देण्यात आलेल आहेत. यामध्ये 13 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा असून, दोन 2-2 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये वॉटर-ड्रॉप नॉच स्क्रीन पॅनेल असून, 6.52 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे.

Related posts: