|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » उद्योग » मूडीजने आर्थिक विकास दराचा अंदाज केला कमी

मूडीजने आर्थिक विकास दराचा अंदाज केला कमी 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

आर्थिक परिस्थिची सामना करत असताना मोदी सरकारला गुरुवारी अजून एक धक्का बसला आहे. मूडीज इन्वेस्टर्स सर्विसकडून चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दराचा अंदाज 5.8 टक्क्यांवरून कमी करत 5.6 टक्क्यांवर करण्यात आला आहे. जीडीपीमधील नरमाई अपेक्षेपेक्षा अधिक कालावधीपर्यंत फेकली गेली असल्यामुळे विकास दराचा आपला अंदाज कमी करावा लागला, असे मूडीजकडून सांगण्यात आले आहे.

भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज कमी केला आहे. आमचा अंदाज आहे की, 2019-20 मध्ये हा 5.6 टक्के राहील जो 2018-19 मध्ये 7.4 टक्के होता, असे क्रेडीट रेटींग आणि संशोधन सेवा कंपनीने म्हटले आहे. मूडीज इन्वेस्टर्स सर्विसेसनुसार, 2020-21 आणि 2021-22 मध्ये आर्थिक परिस्थितीत तेजी येऊन हा अंदाज अनुक्रमे 6.6 टक्के तसेच 6.7 टक्के होईल. परंतु, विकासाची गती मागील वर्षांपेक्षा कमीच राहील. किरकोळ महागाई 4.62 टक्क्मयांवर

 

Related posts: