|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » उद्योग » ऍपलने सादर केले सोन्याचे इअरपॉड्स

ऍपलने सादर केले सोन्याचे इअरपॉड्स 

नवी दिल्ली :

ऍपलने गेल्या महिन्यात रिडिझाईन करण्यात आलेले इअरपॉड बाजारात आणले आहेत. त्यांची अगोदरची आवृत्ती आता रशियन लक्झरी गॅझेट कंपनीने कस्टमाईज केली आहे. प्रिमीयम डिवाइसेस आणि गॅझेट्सचा लक्झरी मेकओव्हर करणारी कंपनी कॅव्हियारने आता ऍपल इअरपॉड्स कस्टमाइज केले आहेत आणि त्यांना 18 कॅरेट सोन्याचा मुलामा दिला आहे. या इअरपॉड्सची किंमत सुमारे 48 लाख रुपये आहे. ऍपलचे इअरपॉड्स सादर करताना कॅव्हियारकडून याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संकेतस्थळावर इअरपॉड्स गोल्ड एडिशनचे तपशील शेअर केले आहेत.कंपनीने आपले इअरपॉड्स नॉइज कॅन्सलेशन आणि सुपीरिअर साउंडसह सादर केले असून, वन-टॅप सेटअप अनुभवाव्यतिरिक्त, सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि आयकॉनिक वायरलेस डिझाइन देण्यात आले आहे.

 

Related posts: