|Thursday, December 5, 2019
You are here: Home » उद्योग » आधारकार्डवरील पत्ता बदलणे झाले सोयीस्कर

आधारकार्डवरील पत्ता बदलणे झाले सोयीस्कर 

वृत्तसंस्था /बेंगळूर :

आधारकार्ड हे प्रत्येक कामासह सरकारी योजनांना लिंक करणे अत्यावश्यक झाले आहे. आधारकार्डवरील पत्त्यामध्ये काही चूक अथवा ठिकाणाचे स्थलांतर झाल्यास पत्ता बदलण्यामध्ये अडचण निर्माण होते. मात्र आता नवीन नियमानुसार आधारकार्डवरील पत्ता बदलणे  अधिक सोयीस्कर झाले आहे.

यूआयएडीआयकडून स्वंय घोषणापत्राच्या मदतीने पत्ता बदलला जाणार आहे. यासाठी भाडे करार किंवा इतर कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही. ज्या व्यक्तीला पत्ता बदलायचा आहे, त्यांना आधार केंद्रावर जाऊन स्वंय घोषणापत्र द्यावे लागेल आणि तुमचा पत्ता बदलला जाईल.

त्याचबरोबर यूआयडीएआयची अधिकृत वेबसाईट वरून अपडेट ऍड्रेस ऑनलाईन पर्याद्वारे काही सुचनांचे पालन करूनही बदल करण्यात येतो. यूआयडीएच्या अधिकृत पेजवर आधार नंबर, कॅप्चा व्हेरिफिकेशन कोड दिल्यानंतर आधारसोबत नोंदणी असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल ज्याची पुष्टी केल्यानंतर लॉगइन करावे लागणार आहे. त्यानंतर ऍपडेट ऍड्रेस व्हाया ऍड्रेस प्रुफ किंवा ऍपडेट ऍड्रेस व्हाया सिक्रेड कोड पर्याय निवडल्यानंतर  नवीन पत्ता टाकावा लागेल. तसेच योग्य कागदपत्राची स्कॅन कॉपी अपलोडची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर ऑनलाईन व्हेरिफिकेशनने आधारकार्डवर पत्ता बदलला जाईल आणि नवीन आधारकार्ड पत्त्यावर पाठवले जाईल.

Related posts: