|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बंगला फोडून सव्वातीन लाखाचा ऐवज लंपास

बंगला फोडून सव्वातीन लाखाचा ऐवज लंपास 

प्रतिनिधी / सांगली

शहरातील आप्पासाहेब पाटील नगरमधील बंद बंगला फोडून रोख रकमेसह सोन्याचांदीच्या दागिन्यासह सुमारे सव्वातीन लाखाचा ऐवज चोरून नेला. या चोरीची शहर पोलिसांत नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, व्यापारी असो.चे अध्यक्ष समीर शहा यांचा शहरातील आप्पासाहेब पाटीलनगर, वखारभाग येथे बंगला आहे. दिवाळीनंतर तीन नोव्हेंबरला शहा हे कुटुंबासह बंगल्याला कुलूप लावून कुलदेवीच्या दर्शनाला गेले होते. प्रवासातच असताना त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरी झाल्याची माहिती शेजारी व मित्रांनी शहा यांनी मोबाईलवर कळविली. प्रवासाहून परत आल्यानंतर त्यांनी या चोरीची फिर्याद शहर पोलिसांत दिली.

चोरीबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरटय़ांनी बंद बंगल्याचे कुलूप तोडून रोख एक लाख 63 हजारासह सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे तीन लाख 18 हजार 200 रू चा ऐवज लंपास केला. फिर्याद शहा यांच्यासह संपर्क साधला असता ते म्हणाले, देवदर्शनाला गेल्यानंतर चोरटय़ांनी बंगल्याचे कुलून तोडून चोरी केली आहे. धनोत्रयोदशी पूजेला ठेवलेले चांदीची दोन किलो नाणी, पाच तोळे सोन्याचे दागिने तसेच दुकानातून आलेली रोकड असा ऐवज चोरून नेला आहे.

Related posts: