|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजेंनी मागितली मुस्लीम समाजाची माफी

उदयनराजेंनी मागितली मुस्लीम समाजाची माफी 

प्रतिनिधी /कराड :

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर गुरूवारी प्रथमच कराडमध्ये आलेले श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी कराडच्या सांगता सभेतील वादग्रस्त वक्तव्यांबद्दल मुस्लीम समाजाची जाहीर माफी मागितली. ही वक्तव्ये केल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका केली.

गुरूवारी येथील पंकज हॉटेलच्या हॉलमध्ये मुस्लीम समाजाशी उदयनराजेंनी संवाद साधला. जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, सुप्रिया खराडे, अर्चना ढेकळे, नगरसेवक बाळासाहेब यादव, किरण पाटील, इसाक मुजावर, आदिल मोमीन, राजू मुल्ला उपस्थित होते.

कराडच्या प्रचार सभेत भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडून पाकिस्तान, हिरवा गुलाल अशी वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यामुळे मुस्लीम समाजाने निर्णायक भूमिका घेतली. आपण ही वक्तव्ये केली नव्हती. तरीही मुस्लीम समाजाची आपण माफी मागत आहोत. ही चूक आपण केलेली नसताना माफी मागत आहोत. आपण छत्रपती शिवरायांच्या विचाराने कार्य करत आहोत. मी त्यावेळी सभेच्या व्यासपीठावर असतो तर जिल्हाध्यक्षांना खाली बसवले असते. हा परिपक्वतेचा भाग आहे. जिल्हाध्यक्ष अजून परिपक्व झालेले नाहीत. त्यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळेच येथे माफी मागण्यासाठी आलो आहे.

Related posts: