|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात चेनस्नेचर्सचा धुमाकूळ

साताऱयात चेनस्नेचर्सचा धुमाकूळ 

प्रतिनिधी /सातारा :

सातारा शहर व परिसरात चेनस्नेचर्सनी धुमाकूळ घातला असून गेल्या दोन महिन्यापासून हे चेनस्नेचर्स वेगवेगळय़ा शकला लढवून मुद्देमाल लुटत आहेत. मात्र, यातील अद्याप एका देखील घटनेतील आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. दि. 12 रोजी एकाच दिवसात चेनस्नेचिंगच्या दोन घटना घडल्यानंतर दि. 13 रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास मंगळवार पेठेत एक महिलेचे मंगळसूत्र चोरटय़ांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.

सातारा शहर परिसरासह ग्रामीण भागात देखील गेल्या दोन तीन महिन्या चेनस्नेचिंगचे प्रकार घडले आहेत. मोटारसायकलवरुन हे चेनस्नेचर येतात अचानकपणे एकटी, दुकटी महिला पाहून हात मारुन जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करण्याचे प्रमाण वाढले आहे. करंजे पेठेतील व मंगळवार पेठेतील दोन दुकानदारांच्या गळय़ातील सोन्याच्या चेन देखील या चेनस्नेचर्संनी बोलता बोलता लंपास केल्या आहेत.

त्यानंतर दि. 13 रोजी भरदिवसा दोन महिलांच्या गळय़ातील मंगळसुत्रे हिसकावून नेत चोरटय़ांनी लाखाचा ऐवज लंपास केला होता. तर दि. 12 रोजी घटलेल्या घटनेत स्वाती निलेश ताटे (वय 38 रा. शिवम कॉलनी, शुक्रवार पेठ, सातारा मूळ रा. तारळे, ता. पाटण) या रात्री पावणेबाराच्या सुमारास विठोबाच्या नळाकडून घराकडे येत असताना मंगळवार पेठेत सुमित्राराजे पतसंस्थेसमोर मोटारसायकलवरुन आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गळय़ातील 15 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेत पोबारा केला. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला मात्र रात्रीच्या वेळ असल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती.

याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी दोन अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. भोसले करत आहेत.

Related posts: