|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » बसप उमेदवाराला पेटविण्याचा प्रयत्न करणाऱयाचा जामीन फेटाळला

बसप उमेदवाराला पेटविण्याचा प्रयत्न करणाऱयाचा जामीन फेटाळला 

पुणे / प्रतिनिधी :

निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांना पाठिंबा दिल्याच्या कारणावरून बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला काळे फासून रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. देशपांडे यांनी हा आदेश दिला.

 काळुराम चौधरी, असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अशोक अजिनाथ माने (वय 46, रा. इंदापूर) यांनी बारामती पोलिसांत फिर्याद दिली आहे. माने हे बसपचे उमेदवार होते. बारामती भिगवण रस्त्यावर कोर्ट कॉर्नर चौक परिसरात 11 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला होता. फिर्यादी हे मित्रांना भेटण्यासाठी गेले असता चौधरी यांच्यासह अन्य काही जणांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांना दुचाकीवर बसवून घटनास्थळी नेले व तेथे त्यांच्या अंगावर काळा रंग आणि रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील रोख 40 हजार रुपये काढून घेतले व घोषणाबाजी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जामिनासाठी धाव घेतल्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी जामिनाला विरोध करताना जामीन फेटाळण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.

 

Related posts: