|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू करा; मुंडेंचे राज्यपालांना पत्र

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू करा; मुंडेंचे राज्यपालांना पत्र 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीनंतर मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला होता. ही माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून हा कक्ष तात्काळ सुरू करण्याची विनंती केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

मुंडे यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, राष्ट्रपती राजवटीनंतर मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. राष्ट्रपती राजवटीत शासनाचा कारभार सुरू ठेवण्याची जबाबदारी घटनेने आपल्यावर दिली आहे. त्यामुळे आपल्या अनुमतीने हा कक्ष पुन्हा सुरू करावा. गोरगरिबांना आर्थिक मदत होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ते निर्देश राज्य प्रशासनाला द्यावेत,असेही मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे.

 

 

 

Related posts: