|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » शिवसेनेच्या नेतृत्त्वातच सरकार बनणार : संजय राऊत

शिवसेनेच्या नेतृत्त्वातच सरकार बनणार : संजय राऊत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्त्वातच सरकार बनणार आहे. 5 वर्ष नाही तर 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, ही माझी इच्छा आहे. मात्र, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असे म्हणणार नाही, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

एका आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. राऊत म्हणाले, राज्यात शिवसेनेच्या नेतृत्त्वातच सरकार बनणार आहे. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी एकसूत्री कार्यक्रम आहे. राज्यात पाऊस आणि इन्फ्रास्टक्चरवर जास्त काम करावे लागेल. आघाडीतील नेत्यांना सरकार चालविण्याचा जास्त अनुभव आहे. त्यामुळे फॉर्म्युल्याची चिंता नको, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ते ठरवतील, असेही राऊत म्हणाले.

 

Related posts: