|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » महाशिवआघाडी 17 नोव्हेंबरला सत्तास्थापन करण्याची शक्यता

महाशिवआघाडी 17 नोव्हेंबरला सत्तास्थापन करण्याची शक्यता 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाशिवआघाडी 17 नोव्हेंबरला नव्या सरकार स्थापनेची घोषणा करणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महाशिवआघाडीने किमान समान कार्यक्रमही निश्चित केला आहे. या नव्या आघाडीचा सत्तावाटपाचाही फॉर्म्युलाही ठरला आहे.

त्यानुसार, शिवसेनेकडेपाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद राहणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 14 तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळण्याची शक्मयता आहे.

राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी महाशिवआघाडीत सातत्याने चर्चा सुरू आहेत. तिन्ही पक्षामंध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले आहे. त्यामुळे येत्या 17 नोव्हेंबरला ही महाशिवआघाडी सत्तास्थापन करण्याची शक्यता आहे.

Related posts: