|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आशिष शेलार मार्केट संपलेला, अदखलपात्र माणूस : खा. राऊत

आशिष शेलार मार्केट संपलेला, अदखलपात्र माणूस : खा. राऊत 

विटा / प्रतिनिधी

आशिष शेलार हा मार्केट संपलेला अदखलपात्र माणूस आहे. त्यांच्या म्हणण्याची शिवसेना दखल घेत नाही अशी झोंबरी टीका शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज सांगली जिल्ह्यात शेतकरी संवाद होत असून त्यानिमित्ताने अनेक शिवसेना नेते खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी चर्चा केली.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकीला शेलार यांनी तीन अंकी नाटक म्हटले होते. शिवाय संजय राऊत यांच्यावर टीका करताना एक व्यक्ती सेना भाजपमध्ये अंतर वाढवत असल्याचे म्हटले होते. त्यावर पत्रकारांनी विचारले असता राऊत यांनी शेलार यांचं मार्केट संपलं आहे असे सांगितले.

Related posts: