|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ मिळावा, अशी विनंती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे यावेळी केली. या दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी या मुद्यावर लगेच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसह शेतकऱयांच्या अन्य मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी काल मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवल्याने बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणालेले, आमचा मोर्चा चालूच रहाणार आहे. आपण पुढच्या वेळी आंदोलन करताना काहीही न सांगता थेट पोहोचू असा इशाराही दिला. सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱयांना मदत करणार नाही का ? असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला होता.

 

 

Related posts: