|Saturday, December 7, 2019
You are here: Home » leadingnews » मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक, मी क्रिकेट खेळत नाही : शरद पवार

मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक, मी क्रिकेट खेळत नाही : शरद पवार 

ऑनलाइन टीम / नागपुर : 

मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक आहे, मी सामने घेतो, मी क्रिकेट खेळत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टोला लगावला. राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कधीकधी तुम्हाला वाटतं की तुम्ही मॅच हारत आहात, मात्र निकाल पूर्णपणे वेगळा लागतो, असं गडकरी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला पवार यांनी आपल्या मिश्किल शैलीमध्ये उत्तर दिले.

शरद पवार यांनी नागपुरात आज पत्रकारांशी मोकळेपणाने संवाद साधला, त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच कोणतंही वक्तव्य नव्हतं. पण काही दिवसांपूर्वी भाजपा आमदारांसोबत बोलताना त्यांनी पुन्हा भाजपचंच सरकार येईल असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. याबाबत विचारले असता, पवार म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्मयात नेहमीच ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, हेच सुरू असतं. मात्र, त्यांना ज्योतिषशास्त्रातलं ही कळतं, हे मला माहित नव्हतं.

Related posts: