|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » Top News » शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी : उध्दव ठाकरे

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी : उध्दव ठाकरे 

कडेगाव/प्रतिनिधी

अवकाळी आणि नुकसानीमुळे खचू नका शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा दिलासा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला. यावेळी ठाकरे यांनी कडेगांव तहसीलदार शैलजा पाटील यांच्याकडे पंचनामा, पीक विमा आदीचीही माहिती घेतली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत ते तातडीने पूर्ण करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. महापूर तसेच अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आज सांगली दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करणे टाळले.

त्यांच्या सोबत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे, शिवसेना सचिव विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, काँग्रेस कार्याध्यक्ष आ. विश्वजीत कदम, . मोहनराव कदम, शिवसेना आमदार अनिल बाबर, संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे, जिल्हाप्रमुख संजय विभूते, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, संघटक बजरंग पाटील, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर आदी पदाधिकाऱ्यांचा ताफाही होता. कडेगांव दौऱ्यात ठाकरे यांनी कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही असे पत्रकारांना सांगितले.

राज्यपालांची दोन दिवसात भेट घेणार

कडेगांव तालुक्यात पाहणीसाठी आलेल्या उध्दव ठाकरे यांच्यासमोर शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशी मागणी ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी येत्या दोन दिवसात आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहोत. शेतकऱ्यांना दिलासा दायक मदत तातडीने करण्यास आपण त्यांना सुचवू. अधिकाऱ्यांनी सरसकट सर्व शेतीचे पंचनामे करावेत असेही ठाकरे यांनी दौऱ्यादरम्यान सांगितले.

Related posts: