|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मानवी संस्कृतीचा धांडोळा घेण्यासाठी नाणकशास्त्र हा अधिकृत स्रोत

मानवी संस्कृतीचा धांडोळा घेण्यासाठी नाणकशास्त्र हा अधिकृत स्रोत 

ऑनलाईन टीम / पुणे :

राजकीय, सामाजिक, तांत्रिक, धार्मिक इतिहासाचा आणि धातूशास्त्राचा पर्यायाने संपूर्ण मानवी संस्कृतीचा धांडोळा घेण्यासाठी नाणकशास्त्र हा सर्वार्थाने अधिकृत स्रोत आहे, असे मत ज्येष्ठ पुरातत्वशासत्रज्ञ आणि दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चचे चेअरमन प्रा. अरविंद जामखेडकर यांनी व्यक्त केले.

इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस्‌तर्फे कर्वे रोडवरील सोनल हॉलमध्ये आयोजित ‘कॉईनेक्स पुणे 2019’ या राष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी जामखेडकर बोलत होते.

यावेळी इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस्‌चे प्रेसिडेंट प्रदीप सोहोनी, संस्थापक सदस्य बस्ती सोळंकी, सेपेटरी शरद बोरा, जॉईंट सेपेटरी श्याम मोटे आदी उपस्थित होते.

यावेळी नाणकशास्त्र क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल अमितेश्वर झा (नाशिक), शोहिन डाया (मुंबई), अशोक जयराज सिंग ठाकूर (चंद्रपूर), जगदीश अगरवाल (कोलकाता) आणि डॉ. मंजिरी भालेराव (पुणे) यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रौप्य महोत्सवानिमित्त सोसायटीतर्फे चांदीच्या 25 ग्रॅमच्या विशेष नाण्याचे अनावरण आणि स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गेली 25 वर्षे इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस्‌तर्फे आयोजित प्रदर्शनात सातत्याने सहभागी होणाऱया व्यक्तींचा तसेच लिलाव संस्थांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना जामखेडकर म्हणाले, इतिहासाचे धागेदोरे जोडताना अनेक लिखित आणि वस्तूरुपाने पुरावे सापडतात. परंतु, त्याबाबतीत काही प्रमाणात वाद-प्रतिवाद होऊ शकतो. असे असताना हा ऐतिहासिक कालक्रम ठरविण्यात नाणकशास्त्र मोलाची भूमिका निभावते. उत्खनना दरम्यान खापरापासून ते अनेक प्रकारचे ऐतिहासिक दुवे सापडतात. त्या दुव्यांना एकसंघपणे बांधण्यात नाणे संग्राहकांची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे.

प्रदीप सोहोनी म्हणाले, यंदा संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून, आजपर्यंत या 25 वर्षांच्या कालखंडात संस्थेतर्फे दुर्मिळ नाणी आणि दुर्मिळ वस्तूंची प्रदर्शने आयोजित केली आहेत. भारताचा इतिहास पाहता सुमारे तीन हजार वर्षांपासून भारतात नाणी प्रचलित आहेत. अशी अतिप्राचीन नाणी या प्रदर्शनात आहेत. या प्रदर्शनात 45 प्रेम्स लावण्यात आल्या असून अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचे नाणक संग्रह पुणेकरांना पहायला मिळणार आहेत. भारतातील विविध ठिकाणांहून हे संग्राहक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. तसेच या प्रदर्शनाच्या कालावधीत दुर्मिळ नाण्यांची खरेदी आणि विक्रीची संधी पुणेकरांना मिळाली आहे.

Related posts: