|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » राज ठाकरे यांनी घेतली लतादीदींची भेट

राज ठाकरे यांनी घेतली लतादीदींची भेट 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी लता मंगेशकर यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेटली. यावेळी त्यांच्या समवेत शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या. सोमवारी पहाटे श्वास घेण्यात त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लता मंगेशकरांच्या भेटीनंतर पत्रकाराशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘लतादीदींची तब्येत उत्तम आहे. दोन-तीन दिवसांत त्यांना जनरल वाॅर्ड मध्ये हलवलं जाईल’ 
दरम्यान, ‘दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय,’ असे काल गुरवारी राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

दरम्यान, सध्या लतादीदी प्रकती स्थिर आहे व आफवा न पसरवण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबयांनी केले आहे.

Related posts: