|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही : चंद्रकांत पाटील

राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही : चंद्रकांत पाटील 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपच नंबर वन असून राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही. राज्यात येणार सरकार भाजपचंच असेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते.

पाटील म्हणाले, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी तिघांनी मिळून सरकार स्थापन केले तर शंभरी दिवस सुद्धा टिकणार नाही. राज्यात निवडून आलेल्या जागा आणि ज्यांच्याकडे 119 आमदार आहेत, त्यांना घेतल्याशिवाय राज्यात कुणाचंही सरकार बनू शकणार नाही. भाजपाकडे 105 जागा तर 14 अपक्ष साथीला आले आहेत. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

Related posts: