|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संवाद स्पर्धा

मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संवाद स्पर्धा 

पुणे / प्रतिनिधी :

 आदर्श शिक्षण मंडळीच्या नातूबाग परिसरातील सौ़ सुशिलाबाई वीरकर मुलांचे हायस्कूल व आदर्श विद्यालय मुलींचे हायस्कूल या शाळेतील माजी विद्यार्थ्यातर्फे श्रीकांत भावे यांच्या स्मृतीनिमित्त श्रीकांत भावे स्मृती करंडक इंग्रजी संवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शहरातील सर्व शाळांना करण्यात आले असून नावनोंदणीची अंतिम मुदत २६ नोव्हेंबर २०१९ आहे़

विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेचा न्यूनगंड दूर करणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे़ ही स्पर्धा शुक्रवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत होणार आहेत तर, बक्षीस वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी ५़३० वाजता होणार आहे़ सदाशिव पेठेतील स्काउट ग्राउंडसमोर उद्यानप्रसाद मंगल कार्यालय येथे स्पर्धा होणार आहेत़ स्पर्धेचे यंदा  १० वे वर्ष आहे़ शाळा व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याकरीता स्पर्धा प्रमुख प्रशांत मते ९८५००५४२४५ किंवा डी.पी जोशी यांच्याशी  ९८२२२७०८१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ही स्पर्धा छोटा गट (५वी ते ७ वी) व मोठा गट (८वी ते १० वी) अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे़  छोट्या गटासाठी मेकिंग लाईफ इको-फ्रेंडली, अ डे इन झू, कम्युनिकेशन गॅप इन फॅमिली, अ निड ऑफ अ मेट्रो ट्रान्सपोर्ट, सेलिब्रेटिंग फेस्टिव्हल्स किपिंग देम सेक्रेड हे विषय आहेत़ मोठ्या गटासाठी व्हॉट शुड बी अवर प्रायॉरिटी – एनव्हायनर्मेंट ऑर डेव्हलपमेंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वुई आर प्राऊड ऑफ इस्त्रो, बर्थ डे सेलिब्रेशन – यस्टर्डे, टुडे, टुमारो, योगा फॉर फिट इंडिया असे विषय आहेत़ 
आदर्श शिक्षण मंडळीच्या शाळेतील शिक्षक श्रीकांत भावे सर यांनी यासाठी अपार कष्ट घेतले़ इंग्रजी भाषा शिकण्यासाठी त्यांनी मुलांना प्रोत्साहन दिले़  त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थी या स्पर्धेचे संयोजन करतात. 

Related posts: