|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » मध्यम, लघुद्योग क्षेत्राचे आर्थिक स्थैर्य वाढविण्याचा प्रयत्न : नितीन गडकरी

मध्यम, लघुद्योग क्षेत्राचे आर्थिक स्थैर्य वाढविण्याचा प्रयत्न : नितीन गडकरी 

पुणे / प्रतिनिधी : 

देशात सध्या सरकारकडून 22 नवीन ग्रीन मार्ग, 100 विमानतळे तसेच नवीन जलवाहतुकीचे मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. यातून या देशातील मध्यम, लघुद्योग क्षेत्राचे आर्थिक स्थैर्य वाढविण्याचा प्रयत्न असून, त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड ऍग्रीकल्चर इंडस्ट्रीजच्या वतीने एक दिवसीय ‘इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, प्रदीप भार्गवा उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, फ्युअर इंटरनागझियोनाल झुजामेनार बाईट (जीआयझेड) जीएमबीएच, भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने पार पडत आहे. देशातील मुंबई, पुणे, बेंगळूर या शहरांची झपाटय़ाने वाढ होत असून, अनेक उद्योगधंदे या शहरांत येत आहेत. त्यामुळे आता लघु, मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक कंपन्यांनी छोटय़ा शहरामध्ये आपले पाय रोवले पाहिजेत.

Related posts: