|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » लवकरच नुकसानभरपाई मिळेल : उद्धव ठाकरे

लवकरच नुकसानभरपाई मिळेल : उद्धव ठाकरे 

ऑनलाइन टीम / सांगली : 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, सांगली व सातारा जिह्यात ओला दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी सांगली जिह्यातील नेवरी ( ता. कडेगाव) येथे आनंदा किसन शिंदे या शेतकऱयांच्या नुकसानग्रस्त टोमॅटोच्या प्लॉटची पाहणी केली. तसेच त्यांना मदतीचेही आश्वासन दिले. ते शेतकऱयांना म्हणाले, ‘शेतकऱयांनो घाबरू नका, लवकरच नुकसानभरपाई मिळेल’. विशेष म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरेंसोबत या दौऱयात काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदमही सहभागी झाले होते.

ठाकरे म्हणाले, शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. संकटसमयी शेतकऱयांना मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीच माझी धडपड आहे. शेतकऱयांना पिकवार नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, कडेगाव तालुक्मयात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने पिकांचे न भूतो असे नुकसान झाले आहे. विशेषतः डाळींब तसेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. तेव्हा शेतकऱयांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.

 

Related posts: