डी वाय पाटील डेंटल स्कूलमध्ये बालदिन साजरा

पुणे / प्रतिनिधी :
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने डी. वाय. पाटील डेंटल स्कूल, लोहेगाव पुणे येथे १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात आला. स्नेह छाया प्रकल्प, विजयनगर, दिघी, पुणे येथील पन्नास विद्यार्थ्यांनी मुख आरोग्य जागरूकता कार्यक्रमात सहभाग घेतला आणि त्यांना मुख स्वच्छता संच देण्यात आले.
डी. वाय. पाटील डेंटल स्कूल, लोहेगाव यांनी या मुलांना मोफत मुख आरोग्यसेवा देण्यासाठी दत्तक घेतले आहे. यावेळी संचालक डॉ. राहुल हेगडे, अधिष्ठाता- डॉ. आनंद शिगली, डॉ. पल्लवी काकडे, डॉ. प्रतेश गवळी आणि प्रियंका गॅरी तसेच इतर कर्मचारीही उपस्थित होते.
Related posts:
Posted in: पुणे