|Monday, December 9, 2019
You are here: Home » उद्योग » उच्च शिक्षणासाठी खासगी गुंतवणुकीची गरज

उच्च शिक्षणासाठी खासगी गुंतवणुकीची गरज 

कुलगुरु प्रा. सी. राज कुमार यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतात जर उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक वाढवली नाही तर चीन व दक्षिण कोरिया सारख्या देशांच्या मागे भारत जाईल. भारतातील शिक्षण क्षेत्रात बदल करण्यासाठी भारत सरकारसोबत खासगी क्षेत्राची समान जबाबदारी आहे. परोपकारी उद्योजकतेने सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी शिक्षणाला समान संधी द्यावी, असे प्रतिपादन ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिवर्सिटीचे संस्थापक कुलगुरु प्रा. सी. राज कुमार यांनी मुंबईत केले.

दोन दशकापूर्वी भारत आणि चीनच्या शैक्षणिक संस्था पाश्चिमात्य भागांच्या तुलनेत समान होत्या. चीन आज शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रस्थानी आहे आणि त्यांची काही विद्यापिठांचा जागतिक क्रमवारीत समावेश आहे. हे धोरण, आर्थिक वचनबद्धता आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे शक्य झाले आहे आणि चीनने उच्च शिक्षणात स्थान निर्माण केले आहे, असेही सी. राज कुमार म्हणाले.

तर 5 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था गाठणे शक्य

5 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था गाठण्यासाठी फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि जपानचे अनुकरण करावे लागले. या राष्ट्रांमध्ये जागतिक विद्यापीठे आहेत. चीनच्या उच्च शिक्षण क्षेत्रामधील विकासाने लाखो लोकांना गरिबीपासून बाहेर काढण्यास मदत केले आणि देशात पूर्णतः बदल केला. उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता निश्चित करणे सर्वात महत्वाचे आहे. भारत भविष्यातील पीढीसाठी हे वचन पूर्ण करू शकेल, असे जिंदल स्कूल ऑफ बँकिंग अँड फायनान्सचे आशिष भारद्वार यांनी सांगितले.

Related posts: