|Saturday, December 7, 2019
You are here: Home » उद्योग » एअरटेलला 23 तर व्होडाफोनला 51 हजार कोटींचा तोटा

एअरटेलला 23 तर व्होडाफोनला 51 हजार कोटींचा तोटा 

तिमाहीतील आकडेवारी स्पष्ट : कार्पोरेट इतिहासातील सर्वाधिक फटका

वृत्तसंस्था / मुंबई

व्होडाफोनने जिओबाबत पक्षपात करत असल्याचा आरोप होत असून, दुसऱया तिमाहीचे आकडे आले समोर आले आहेत. त्यात एअरटेलला 23 हजार कोटी तर व्होडाफोन-आयडियाला तब्बल 51 हजार कोटींचा तोटा झाला आहे. एअरटेलला सर्वोच्च न्यायालयाने थकबाकी देण्याचे आदेश दिल्याचा फटका बसला आहे. यामुळे कंपनीला आजपर्यंतचा सर्वाधिक 23045 कोटींचा तोटा झाला आहे. 

सरकार समायोजित सकल महसूल 39,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त देण्यांवर दिलासा दिला नाही तर कंपनीत आणखी गुंतवणूक करणार नाही. असे केल्यास व्होडाफोन-आयडिया दिवाळखोरीत जाईल, असे एअरटेलच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे. व्होडाफोनलाही जबर फटका सोसावा लागला असून 50921 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या तिमाहीमध्ये कंपनीला 4947 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. हा भारताच्या कार्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा तिमाही तोटा आहे.

93 हजार कोटी रुपये थकबाकी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व मोबाईल कंपन्यांनी 93 हजार कोटी रुपयांची थकबाकी ताबडतोब जमा करावी, असे आदेश दूरसंचार मंत्रालयाने सर्व मोबाईल कंपन्यांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 24 ऑक्टोबर रोजी ही रक्कम भरण्याचे बंधन मोबाईल कंपन्यांवर घातले होते. सध्या जवळपास सर्वच मोबाईल कंपन्या आर्थिक अडचणीत असताना सध्या ही रक्कम भरणे शक्मय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, टाटा ग्रुप, रिलायन्स कम्युनिकेशन्स, एअरसेल आणि व्हिडीओकॉन या कंपन्यांनी मिळून ही रक्कम सरकारला द्यायची आहे. न्यायालयाच्या दिलेल्या निर्णयापासून तीन महिन्यांत ही रक्कम भरण्याचे बंधन या मोबाइल कंपन्यांवर आहे. आता अचानक दूरसंचार मंत्रालयाने हे पत्र कंपन्यांना पाठविले आहे. परवाना शुल्क व अन्य थकबाकीची ही रक्कम आहे.

Related posts: