|Friday, December 13, 2019
You are here: Home » उद्योग » ‘विवो एस 5’ भारतात सादर

‘विवो एस 5’ भारतात सादर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीनची स्मार्टफोन कंपनी विवोने ‘एस 5’ स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. बीजिंगमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन सादर केला आहे. काही दिवसांपूर्वी या फोनचे फिचर्स ऑनलाईन प्रदर्शित झाले होते. तेव्हापासूनच वापरकर्त्यांमध्ये फोनविषयी उत्सुकता लागून होती. ‘विवो एस 5’मध्ये  चार रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच 28 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सल असे तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. फोनची सुरुवातीची किंमत जवळपास 27 हजार आहे. तसेच, विवो एस 5 च्या टॉप वेरियंटची किंमत 30 हजार रुपये आहे.

फोनची ब्राइटनेस लेव्हल 1200 ठेवण्यात आली आहे. या फोनमुळे डोळय़ांवर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. तसेच, फोनमध्ये 6.44 इंच ओएलइडी डिस्प्ले दिला असून, त्याचे रिजॉलूशन 1080 पिक्सल आहे. फोनमध्ये ऑन स्क्रीन कॅमेरा सेंसरसुद्धा आहे.

Related posts: