|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » उद्योग » ‘चेतक इलेक्ट्रिक’ भविष्यातही इतिहास घडविणार

‘चेतक इलेक्ट्रिक’ भविष्यातही इतिहास घडविणार 

प्रतिनिधी  / पिंपरी

वर्षानुवर्षे जनमानसाच्या मनावर गारुड घालणारी ‘बजाज चेतक’ आता नव्या रंगरुपात आणि नवी वैशिष्टय़े घेऊन समोर आली असून, बजाज चेतक आता ‘लाईट’वर रस्त्यावर धावणार आहे. बजाज चेतक हा ब्रँड भूतकाळात मैलाचा दगड ठरले आणि भविष्यातही इतिहास रचेल, असा विश्वास बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी गुरुवारी आकुर्डी येथे व्यक्त केला.

आकुर्डी येथे आयोजित या कार्यक्रमाला व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज हे उपस्थित होते. राजीव बजाज यांनी या वेळी पत्रकारांशी संवाद साधला.

नवी दिल्लीमध्ये 16 ऑक्टोबर 2019 रोजी चेतक इलेक्ट्रिक सादर करण्यात आली होती. या कार्यक्रमात दिल्लीतून सुरू झालेल्या चेतक इलेक्ट्रिक यात्रेला रस्ते आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी यांनी हिरवा झेंडा दाखविला होता. 20 चेतक रायर्ड्स यांनी उत्तर आणि पश्चिम भारताचा 3000 किमीहून अधिकचा प्रवास करत पुण्यापर्यंतचा टप्पा गाठला. आकुर्डी येथील प्लान्टमध्ये बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी या चेतक इलेक्ट्रिक यात्रेचे स्वागत केले.

व्यवसायात अप-डाउन येत राहतात :  बजाज

जीएसटी आणि कमी कमी होत असलेली सबसिडी यामुळे प्रत्येक व्यवसायाची आर्थिक घडी विस्कटत आहे. हे एका अर्थी खरे असले, तरी दुसरी बाजुही व्यावसायिकांनी पहावी. सरकारने अर्थव्यवस्थेत सुधारणा नक्कीच केल्याच पाहिजेत. जागतिक मंदीची भारताला झळ पोहोचत असली तरी योग्य पावले टाकली, तर  अर्थव्यवस्था स्वत:च्या बळावर विकासाची गती वाढवू शकते. प्रत्येक व्यवसायात अप-डाउन येत राहतात. मात्र, यातून उभारी घेण्यासाठी व्यावसायिक, कंपन्या प्रत्येकाने नवीन बाजारपेठ, नवीन उत्पादन शोधणे गरजेचे झाले आहे. स्वत:ला वर्ल्ड क्लास केल्याशिवाय हे शक्मय नाही, असे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज   यांनी सांगितले.

Related posts: