|Saturday, December 7, 2019
You are here: Home » उद्योग » ‘स्पाईस जेट’ला नियमित चार कोटींचा तोटा

‘स्पाईस जेट’ला नियमित चार कोटींचा तोटा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्पाईस जेट कंपनीच्या सप्टेंबरअखेर तोटय़ामध्ये वाढ झाली असून, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला 462 कोटींचा तोटा झाला आहे. गेल्या वषीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या तोटय़ात 19 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये या कंपनीला 724 कोटी रुपयांचा तोटा झाला असून, कंपनीला दैनंदिन चार कोटींचा तोटा होत आहे. कंपनीच्या महसुलात मात्र वाढ झाली असून सप्टेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये स्पाईस जेटने 2,845 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले आहे. गेल्या वषीच्या तुलनेत यामध्ये 52 टक्के वाढ झाली आहे. मोठय़ा प्रमाणावर प्रवासीक्षमता असणारे 737 मॅक्स बोईंग विमान तांत्रिक व इतर कारणांमुळे मार्चपासून सेवेत नसून कंपनीला प्रामुख्याने त्याचा फटका बसला आहे. विमानसेवा क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून मागणी घटली असून, त्याचे प्रतिबिंब या आर्थिक निकालांमध्ये उमटले आहे. मात्र येत्या काही दिवसांत प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होईल याबाबत आम्ही आशावादी आहोत, असे कंपनीचे अध्यक्ष अजय सिंग यांनी सांगितले.

Related posts: