|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राज्यात भाजपशिवाय सरकार अशक्य

राज्यात भाजपशिवाय सरकार अशक्य 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा

कडबोळे सरकार टिकणार नाही

ब्लर्ब : राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष

मुंबई / प्रतिनिधी

राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या हालचाली गतिमान झाल्या असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी

शुक्रवारी भाजपशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य असल्याचा दावा केला. भाजप वगळून होऊ घातलेले कडबोळे सरकार टिकणार नाही, असे भाकितही त्यांनी वर्तवले. भाजप वगळता कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता येणार नसल्याने येणारे सरकार भाजपचेच असेल आणि मुख्यमंत्रीही भाजपचाच राहिल, असेही त्यांनी सांगितले.

प्रदेश भाजपची संघटनात्मक बैठक आज येथे पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी राज्यात भाजपचेच सरकार येणार असल्याचा पुनरूच्चार केला. राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे. आमचे 105 आमदार निवडून आले आहेत. भाजपला समर्थन देणाऱया मित्र पक्ष आणि अपक्ष आमदारांची संख्या धरून भाजपचे संख्याबळ 119 होते. त्यामुळे भाजपला वगळून सरकार स्थापन करता येणार नाही, असे पाटील म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत भाजपला 1 कोटी 42 लाख मते मिळाली. त्यानंतर दुसऱया क्रमांकावर राष्ट्रवादीला 92 लाख तर शिवसेनेला 90 लाख मते मिळाली. याचा अर्थ दुसऱया क्रमांकाचा पक्ष भाजपपासून खूप दूर आहे. गेल्या निवडणुकीत आम्ही 260 जागा लढवल्या आणि त्यापैकी 122 जागा जिंकल्या. आता 164 जागा लढवून 105 जागा जिंकल्या आहेत. सर्वात जास्त 12 महिला उमेदवार भाजपच्या निवडून आल्या आहेत. भाजप 59 जागांवर पराभूत झाला त्यापैकी 55 जागांवर भाजप उमेदवाराने दुसऱया क्रमांकाची मते घेतली आहेत. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांपैकी 26 जणांना आम्ही उमेदवारी दिली आणि त्यातील 16 उमेदवार विजयी झाले. 1990 नंतर कोणत्याही पक्षाला 100 जागांवर विजय मिळवता आलेला नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

शेतकऱयांना जास्तीत  जास्त मदत मिळावी

दरम्यान, अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांना जास्तीत जास्त मदत कशी मिळू शकेल, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. शेतकऱयांना 23 हजार कोटी रूपयांची पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. प्रत्येक आमदाराने मतदारसंघात जाऊन शेतकऱयांना मदत आणि दिलासा द्यावा, अशा सूचना फडणवीस यांनी केल्याची माहिती पाटील यांनी दिली.

राणे, हर्षवर्धन पाटील यांची अनुपस्थिती

दरम्यान, भाजपच्या संघटनात्मक बैठकीला नारायण राणे, हर्षवर्धन पाटील अनुपस्थित होते. या दोघांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. भाजपची कार्यपध्दती या नेत्यांच्या अंगवळणी पडली नसल्याचे त्यांच्या गैरहजेरीवरून दिसते.

Related posts: