|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » प्रिन्स दुर्घटना; पालिकेचे आर्थिक मदत देण्यासाठी धोरण

प्रिन्स दुर्घटना; पालिकेचे आर्थिक मदत देण्यासाठी धोरण 

सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत होणार निर्णय नगरसेवकांच्या मागणीमुळे धोरण तयार होणार

मुंबई / प्रतिनिधी

केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला प्रिन्स राजभरला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी त्याच्या पालकांना पालिकेने तातडीने 10 लाख रुपये देण्याची मागणी स्थायी समिती बैठकीपाठोपाठ शुक्रवारी पालिका सभागफहात सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी केली. मात्र, महापालिकेने प्रिन्सला आर्थिक मदत देण्याबाबत धोरण नसल्याचे कारण देत हात वर केले आहेत. ही गंभीर बाब

लक्षात घेता महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत आयुक्तांशी चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा पालिका सभागफहात केली.

पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्यांद्वारे जखमी प्रिन्सच्या दुर्घटनेचा विषय उपस्थित केला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच प्रिन्स भाजला जाऊन त्याचा हात कापावा लागला, असा आरोप केला. तसेच पालिकेचे 79 हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी बँकांमध्ये ठेवून काय करणार ? पालिकेने त्यापेक्षा त्या प्रिन्सच्या पालकांना 10 लाखांची आर्थिक मदत देऊन न्याय द्यावा. त्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणी केली.

 तर काँग्रेसचे आश्रफ आजमी यांनी मालाड भिंत दुर्घटनेतील मफतांच्या वारसाला पालिकेने धोरण नसतानाही केवळ मुख्यमंत्री यांच्या आदेशाने तत्काळ आर्थिक मदत केली. तर मग याठिकाणी प्रिन्सला आर्थिक मदत का करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित केला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव भाजपचे गणेश खणकर, विनोद मिश्रा, राजश्री शिरवाडकर, रजनी केणी, शिवसेनेचे सचिन पडवळ आदींनी पालिकेशी संबंधित दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी, मफत झाल्यास त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी धोरण तयार करण्याची मागणी केली.

 धोरण नसल्याने अडचण : अतिरिक्त आयुक्त

अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी प्रिन्सच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी पालिकेचे धोरण नसल्याचे कारण देत हात वर केले. जर धोरण बनवले तरच मदत करणे शक्य होईल, असे सांगितले. तसेच पालिकेने रेल्वेच्या धर्तीवर रुग्णालयात ओपीडीमध्ये केसपेपर काढल्यापासून रुग्णालयात त्या रुग्णाच्या जीवाला एखाद्या दुर्घटनेत काही इजा झाली, मफत्यू झाल्यास त्याला मदत करण्याची तरतूद लागू करण्याबाबत धोरण प्रस्तावित असल्याचे जोशी यांनी सांगितले.

चौकशी अहवाल सादर

प्रिन्स दुर्घटनेप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारमल यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही प्रिन्स ज्या बेडवर भाजला होता, बेडच्या गादीचा भाग व ती ईसीजी मशीन लॅब टेस्टसाठी पाठविण्यात आली आहे. तिचा फॉरेन्सिक अहवाल यायचा बाकी असल्याचे जोशी यांनी सांगितले.

Related posts: