नदीकाठच्या गावातील वाळू साठय़ांचे पंचनामे करण्याचे तहसिलदारांचे आदेश

वार्ताहर/ भुईंज
कृष्णा नदीच्या काठावरील वाईपासून खडकीपर्यंतच्या सर्व गावानजीक असलेल्या डोहानजीक साठलेल्या वाळूचे रक्षण करणे ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे कर्तव्य आहे. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी प्रशासनास योग्यवेळी माहिती दिल्यास अनाधिकृत वाळू उपशास पायबंद घालता येतो, असे मत वाईचे तहसिलदार रणजित भोसले यांनी केले. भुईंज येथील कृष्णा नदीच्या पात्रात वाळुची चोरी होते. या तक्रारीची दखल घेत आज वाईचे तहसिलदार रणजित भोसले व भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि श्याम बुवा, सर्कल भिमराव इंगळे, तलाठी सीमा साबणे, महेश सुतार, विलास खरात यांनी नदीकाठावरील वाळू साठय़ांची पाहणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत तहसिलदार भोसले यांनी मत व्यक्त केले.
यावेळी तहसिलदार भोसले म्हणाले, प्रत्येक गावातील गौण खनिजाची सुरक्षा करणे हे प्रत्येक गावकऱयांचे विशेषत: सरपंच यांची जबाबदारी असते. त्यामुळे शासनाने गावदक्षता कमिटी तयार केली असून त्याचा अध्यक्ष सरपंच असतो. अन्य सदस्य, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल हे या कमिटीत असतात. प्रत्येक महिन्यात एक मिटींग घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार भुईंज येथे उपसलेली चाळलेली वाळू तातडीने पंचनामा करून तातडीने वाई तहसिल कार्यालयासमोर पोहच करण्याचे आदेश तलाठी यांनी दिले.
तसेच यापुढे नदीकाठच्या कोणत्याही गावातील वाळूंची होणारी चोरी मला किंवा पोलिसांना कळवा, त्वरीत कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. वाळू सहीत गौण खनिज वाचविऱयाया ग्रामस्थांसह पत्रकारांचे आभार मानले. यावेळी उपसरपंच प्रशांत जाधव, माजी सरपंच अर्जुन भोसले, धनाजी कदम, वसंतराव भोसले, किशोर भोसले, अजय भोसले, भिकाजी वारागडे आदी उपस्थित होते.