|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक

लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक 

 पुणे / प्रतिनिधी :

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात (सदर्न कमांड) नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांची 12 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी चार जणांविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम महादेव शेडगे (27, रा. रहाटणी, पुणे), सागर विश्वासराव भगत (31, रा. वाल्हेकरवाडी, पुणे), नारायण दहीफळे (रा. चाकण, पुणे), गणेश परदेशी (रा. शिवणे, रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शरद कुंडलिक गोयकर (26, रा. वाल्हेकरवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून आणि विश्वास संपादन करून फिर्यादी तसेच अंकुश अंबादास धरणे आणि श्रीराम चव्हाण यांना सदर्न कमांड मिलेटरी इंजिनिअरिंग येथे लोअर डिव्हीजन क्लर्क व स्टोअर किपर म्हणून नोकरी लावतो, असे सांगत 12 लाखांची फसवणूक केली आहे. वेळोवेळी तक्रारदार यांच्याकडे पैसे घेऊनही त्यांना नोकरीस न लावता अथवा पैसे परत न करता फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार करत आहेत.

 

Related posts: