|Friday, December 13, 2019
You are here: Home » Top News » बिल गेट्स यांच्या हस्ते उद्या डॉ. प्रकाश आमटेंचा गौरव

बिल गेट्स यांच्या हस्ते उद्या डॉ. प्रकाश आमटेंचा गौरव 

ऑनलाईन टीम / मुंबई :

 बिल ऍन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना ‘लाईफटाईम ऍचिव्हमेंट मेडल’ने गौरवण्यात येणार आहे. उद्या (दि. 17) सायंकाळी नवी दिल्लीतील आयसीएमआर हॉल येथे हा सोहळा पार पडणार आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोलीतील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी भरीव कार्य केले आहे. स्वतःचे संपूर्ण आयुष्य त्यांनी आदिवाशींच्या सेवसाठी समर्पित केले आहे. गडचिरोली जिह्यातील हेमलकसा या दुर्गम भागात आमटे दाम्पत्य आदिवासी जनतेची सेवा करतात. वैद्यकीय सेवेबरोबरच आरोग्य विषयक विकास, शिक्षण प्राणी, अनाथालय आदी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आमटे दाम्पत्याला यापूर्वी मॅगेसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. आमटे यांच्याबरोबरच डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांचाही बिल गेट्स यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

 

 

Related posts: