|Saturday, December 7, 2019
You are here: Home » leadingnews » एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नाही : संजय राऊत

एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नाही : संजय राऊत 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेवरून दोन्ही पक्षात निर्माण झालेली दरी राष्ट्रीय पातळीवरही वाढणार असल्याची चिन्ह आहेत.

येत्या सोमवारपासून (18 नोव्हेंबर) संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएच्या सर्व घटक पक्षांची उद्या बैठक होणार आहे. भाजप आणि शिवसेनेतील दुरावे पाहता अधिवेशनात शिवसेनेची विरोधी भूमिका भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभा आणि राज्यसभेत बैठक व्यवस्थाही बदलली जाणार का? आणि शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर दिसणार का? याची आता उत्सुकता आहे.

दरम्यान, उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व नेते उद्या मुंबईत हजर राहणार आहेत. सर्व आमदारांनाही उद्या मुंबईत हजर राहण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. शिवसेनेसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असल्याने देखील शिवसेना उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

 

Related posts: