|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : संजय राऊत

एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : संजय राऊत 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि महाराष्ट्राला गोड बातमी मिळेल असंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

एनडीएच्या बैठकीला शिवसेना हजर राहिली नाही याबाबत विचारलं असता त्यांनी आम्हाला बोलावलं की नाही बोलावलं हे माहित नाही मात्र न जाण्याचा निर्णय आधीच ठरला आहे. एनडीए ही कोणाचीही जहागीर नाही आम्ही एनडीएच्या स्थापनेपासून आहोत असंही संजय राऊत म्हटलं आहे.

राऊत म्हणाले की, एनडीए कुणाच्या मालकीची नाही. शिवसेना, अकालीदल हे एनडीएचे संस्थापक आहे. जे एनडीएचे सध्याचे सूत्रधर आहेत ते त्यावेळी नव्हते. आम्हाला एनडीएतून दूर होण्यासाठी राज्याची राजकीय परिस्थिती कारण आहे. स्वाभिमानासाठी आम्ही एनडीएतून बाहेर पडलो आहोत, असेही राऊत म्हणाले. जर आता बाहेर पडलो नसतो तर राज्यातील जनतेने आम्हला माफ केले नसते, असे ते म्हणाले.

 

Related posts: