|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » leadingnews » राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱयांना मदत जाहीर

राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱयांना मदत जाहीर 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांसाठी राज्यपालांनी मदत जाहीर केली आहे. त्यानुसार, खरीपासाठी शेतकऱयांना प्रति हेक्टर 8 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर फळबागासाठी हीच मदत 18 हजार रुपये प्रति हेक्टर दिली जाणार आहे. अशी घोषणा राज्यपालांनी शनिवारी केली.

राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि ओल्या दुष्काळाचा शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी पीडित शेतकरी आणि फळबागांना भेटी देऊन मदतीचे आश्वासन दिले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस आमदार विश्वजित कदम आदींनी शेतकऱयांच्या भेटी घेतल्या होत्या.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी जारी केलेल्या मदतीनुसार,  खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर 8 हजार रुपये आणि फळबाग करणाऱ्या शेतकऱयांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत दिली जाईल. खरीप आणि फळबाग अशा दोन्ही प्रकारच्या नुकसानीसाठी कमाल 2 हेक्टरपर्यंत भरपाई दिली जाईल. सोबतच, अशा भागातील शेतकऱयांची शाळा आणि महाविद्यालयाची फी देखील माफ केली जाणार आहे. राज्यपालांनी ही मदत त्वरीत लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Related posts: