|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » केईएम रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या

केईएम रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या 

प्रेमभंगातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

मुंबई / प्रतिनिधी

 केईएम रुग्णालयात एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. डॉ. प्रणय राजकुमार जयस्वाल (27) असे या डॉक्टरचे नाव असून त्यांनी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.  तर प्राथमिक तपासात प्रेमभंगातून त्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले  आहे.

  केईएम रुग्णालयाच्या आवारात असलेल्या निवासी डॉक्टर हॉस्टेलच्या टेरेसवर त्यांचा मफतदेह आढळून आला. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी अपमफत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मूळ अमरावतीचे असलेले डॉ. प्रणय हे डॉ. समर्थ पटेल या रूम पार्टनरसह गेल्या तीन वर्षांपासून केईएमच्या हॉस्टेलमध्ये राहत होते. डॉ. प्रणय हे सिनियर रेसिडन्स जनरल सर्जन होते. ते घरगुती कारणावरून मागील काही महिन्यांपासून वैफल्यग्रस्त होते. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून त्यांचा फोन बंद येत होता. फोन बंद येत असल्याने मित्रांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचा शोध लागत नव्हता.

 अखेर डॉक्टर प्रणय बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या दरम्यान हॉस्टेलच्या गच्चीवर त्यांचा मफतदेह सापडला. मफतदेहाजवळ आय. व्ही. इंजेक्शन पोलिसांना सापडल्याचे सांगण्यात आले. डॉ. प्रणय यांच्या कुटुंबियांना या प्रकरणाची माहिती कळविण्यात आली आहे. दरम्यान, अमरावतीला शिकत असताना प्रणव यांचे एका तरुणीवर प्रेम होते. ते दोघे लग्नही करणार होते. मात्र, काही कारणास्तव यांच्यात वाद होऊन ते वेगळे झाले. तेव्हापासून प्रणव हे मानसिक नैराश्येत होते. अशातच त्यांनी अवास्तव दारू प्राशन करण्यास सुरुवात केली होती. त्यातच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

Related posts: