|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » इंद्राणीला तज्ञ डॉक्टरांची गरज

इंद्राणीला तज्ञ डॉक्टरांची गरज 

प्रकृती सातत्याने खालावत जात असल्याचा वकिलांचा सत्र न्यायालयात दावा

मुंबई / प्रतिनिधी

शीना बोरा हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीची प्रकृती सातत्याने खालावत जात आहे. त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी तिला तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेणे अत्यावश्यक आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी  सांगितले असल्याचा दावा इंद्राणीचे वकील ऍड. तन्वीर अहमद यांनी सीबीआय विशेष न्यायालयात नुकताच केला.

इंद्राणी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. तिचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने तीनवेळा नाकारलेला असतानाच साधारणतः सहा महिन्यांपूर्वी इंद्राणीने प्रकृती स्वास्थाच्या कारणावरून अजून एक जामीन अर्ज केला होता. त्या अर्जावर नुकतीच न्या. जे. सी. जगदाळे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. इंद्राणीची प्रकृती खालावत जात असून तज्ञ डॉक्टरांकडून उपचार होणे अत्यावश्यक आहे. तुरुंगात तिच्यावर योग्य उपचार होऊ शकणार नाहीत. तसेच नोव्हेंबर 2018 मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे इंद्राणीची दर तीन महिन्यांनी वैद्यकीय तपासणीही झालेली नाही, असा दावा तिचे वकील ऍड. अहमद यांनी केला. मात्र, सीबीआयने इंद्राणीच्या अर्जाला विरोध दर्शवला. या खटल्यातील 36 साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या असून अद्याप पीटर मुखर्जीचा मुलगा राहुलची महत्त्वाची साक्ष नोंदवलेली नाही. त्यामुळे इंद्राणीला जामीन दिल्यास ती राहुलसह अन्य साक्षीदारांवर दबाव आणून शकते. त्याचा परिणाम खटल्यावर होऊ शकतो, असा युक्तिवाद सीबीआयच्या वकिलांनी केला आहे.

Related posts: