|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » उपनगरीय रेल्वेमार्गावर तब्बल 14 हजार 351 सिग्नल बिघाड

उपनगरीय रेल्वेमार्गावर तब्बल 14 हजार 351 सिग्नल बिघाड 

माहिती अधिकारी समीर झवेरी यांनी केला खुलासा; तीन वर्षातील मध्य, पश्चिम रेल्वेवरील सिग्नल बिघाडाची धक्कादायक माहिती उघड

मुंबई / प्रतिनिधी

उपनगरीय रेल्वे मार्गावर नियमित वाहतूक सुरू असताना सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास झाल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अशातच माहिती अधिकारी समीर झवेरी यांनी तीन वर्षामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर झालेल्या सिग्नल बिघाडाच्या घटनांची धक्कादायक आकडेवारी उघड केली. ज्यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर तीन वर्षात तब्बल 14 हजार 351 वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे समोर आले.

मुंबईच्या लाईफलाईनची सुरळीत आणि वेळेवर धावण्याची धुरा सिग्नल यंत्रणेवर अवलंबून असते. मात्र, दर दोन दिवसाआड सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. अशातच आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षात मध्य, पश्चिम रेल्वेचे 14 हजार 351 सिग्नल बिघाड झाले. तर गेल्या आर्थिक वर्षात (2017-18) दररोज सरासरी तीन सिग्नल बिघाड झाल्याची माहिती आरटीआयतून उघडकीस आली. आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी जानेवारी 2016 ते सप्टेंबर 2019 पर्यंतची मध्य आणि पश्चिम रेल्वेवर किती सिग्नल बिघाड, इंजिन बिघाड आणि रुळाला तडे झाले, याची माहिती मागितली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे 1 जानेवारी 2016 पासूनची माहिती रेल्वेने झवेरी यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे. या माहिती अधिकारातून पश्चिम रेल्वेवर तीन वर्षात 4 हजार 504 बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 2016-17 या आर्थिक वर्षात तब्बल 1 हजार 541 सिग्नल बिघाड झाल्याने ट्रेनची वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांना मोठा फटका बसल्याचे झवेरी यांनी म्हटले आहे.

तर 2017ö18 या आर्थिक वर्षात 1 हजार 63 सिग्नल बिघाड झाल्याचे उघडकीस आले. तर 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत 592 सिग्नल बिघाडाच्या घटना घडल्या. तसेच सिग्नल बिघाडाचा आलेख पाहता 2018-19 या आर्थिक वर्षात 1 हजार 63 सिग्नल बिघाड घडल्याने दररोज सरासरी तीन सिग्नल बिघाड घडल्याने ट्रेनचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या नऊ महिन्यांतच 592 सिग्नल बिघाड झाले असल्याचे उघडकीस आले आहे. तर मध्य रेल्वेवर जानेवारी 2016 ते सप्टेंबर 2019 मध्ये एकूण 9 हजार 847 सिग्नल यंत्रणेत बिघाड आणि 323 वेळा रेल्वे रुळाला तडे जाण्याची घटना घडली आहे. 

तीन वर्षातील बिघाड  (जानेवारी 2016 ते सप्टेंबर 2019)

 बिघाड         मध्य रेल्वे      पश्चिम रेल्वे

सिग्नल यंत्रणा    9847        4504

रेल्वे रुळाला तडे    323           93

Related posts: