|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन 

मुंबई / प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन असून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मोठय़ा संख्येने स्मृतिस्थळावर येणार आहेत.

सकाळी 7 वाजल्यापासून स्मृतिस्थळावर दर्शनाला सुरुवात होईल. बाळासाहेबांवर प्रेम करणारे लोक लाखोंच्या संख्येने येणार असल्याने येथे पालिका तसेच शिवसेनेच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई हे स्वत: या तयारीचा आढावा घेतला. राज्यातील सध्याचे राजकीय समीकरण बघता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही बाळासाहेबांना अभिवादन करायला स्मृतिस्थळावर येण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी 2019 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर निवास येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे स्मारक बांधकांमाचे भूमिपूजन केले होते. आज भाजपचे कोण कोण नेते स्मृतिस्थळावर येतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related posts: