|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » प्रिन्स दुर्घटनेप्रकरणी 25 जणांची चौकशी

प्रिन्स दुर्घटनेप्रकरणी 25 जणांची चौकशी 

अधिष्ठाता, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी कर्मचाऱयांचा समावेश

मुंबई / प्रतिनिधी

केईएम रुग्णालयात घडलेल्या प्रिन्स दुर्घटनेचे गंभीर पडसाद महापालिका सभेत व स्थायी समिती बैठकीत उमटले आहेत. त्यामुळे प्रशासनाने डॉ. भारमल यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यामध्ये रुग्णालयाचे अधिष्ठाता, नर्स, वॉर्डबॉय आदी 25 जणांची चौकशी करण्यात आल्याचे समजते.

प्रिन्सचा हात जास्त प्रमाणात भाजल्याने व त्याला संसर्ग झाल्याने डॉक्टरांनी त्याचा हात कापण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रिन्सच्या आई-वडिलांनीही मुलाचा जीव वाचविण्यासाठी परवानगी दिली. मात्र, जेव्हा रात्रीच्या सुमारास ही घटना घडली त्यावेळी तेथील डॉक्टर, नर्स, वार्डबॉय हे कुठे गेले होते ? त्यांचे कोणाचेच याकडे लक्ष का गेले नाही ? मुलगा एवढा भाजेपर्यंत ही सर्व मंडळी काय करत होते ? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

आता या घटनेत प्रथमत: ईसीजी मशीनमधील यंत्रावर आणि मुख्य डॉक्टरांवर याचे खापर फोडण्यात येणार नसल्याचे वाटते. त्याचप्रमाणे तेथील नर्स, वॉर्ड बॉय यांच्यावर खापर फोडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जेव्हा या प्रकरणाचा चौकशी अहवाल सार्वजनिक केला जाईल तेव्हाच ती घटना नेमकी काय व कशी घडली ? त्यामध्ये कोणाचा दोष होता ? याबाबतचे सत्य समोर येईल. त्यामुळे या प्रकरणाचा अहवाल जेव्हा पालिकेत पोहोचल्यानंतर त्याचे जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts: