|Friday, December 6, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » व्यवस्थापन शिक्षणासाठीचे प्रवेशद्वार- सीमॅट 2020

व्यवस्थापन शिक्षणासाठीचे प्रवेशद्वार- सीमॅट 2020 

आजच्या युगात उत्तम व्यवस्थापनाची गरज प्रत्येक क्षेत्रात प्रकर्षाने जाणवते आहे. अभियांत्रिकी क्षेत्राचा दबदबा आजही वाढलेला असला तरी अभियांत्रिकी पदवीधरांना आज नोकरीच्या संधी तुलनेने मुबलक नाहीत. याव्यतिरीक्त आज इतरही काही क्षेत्रे आहेत ज्यांचा मुलांना आवर्जून विचार करावा लागतोय. यात आता व्यवस्थापन अर्थात मॅनेजमेंटचे क्षेत्रही आघाडी घेताना दिसतंय. व्यवस्थापन क्षेत्राची लोकप्रियता आजच्या घडीला कैकपटीने वाढलेली आहे. सर्वात लोकप्रिय करिअर ऑप्शन म्हणूनही या क्षेत्राकडे आजचे विद्यार्थी पाहतात. पदवीनंतर अनेकजण व्यवस्थापनातील पदवी मिळवण्यासाठी नामवंत किंवा प्रतिष्ठीत महाविद्यालय, संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपडत असतात. या व्यवस्थापन अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो तो सीमॅट अर्थात कॉमन मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट 2020 च्या माध्यमातून. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ही संस्था आयोजीत करणार आहे.

 सीमॅट 2020 पुढील वर्षी 28 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. 7 फेबुवारी 2020 रोजी परीक्षेचा निकाल घोषित होणार आहे. सीमॅटमधील यशस्वी उमेदवारांना पुढे देशभरातील 1 हजारहून महाविद्यालये, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो.

शैक्षणिक पात्रता काय लागते

सीमॅट परीक्षा द्यायची असेल तर उमेदवार पदवीधर असायला हवा. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे ज्यांचा निकाल शैक्षणिक वर्ष 20-21 मध्ये प्रवेश सुरू होण्याआधी घोषित होणार आहे अशांना अर्ज करता येतो. यासंबंधी संकेतस्थळावर अधिकृतपणे जाणून घेता येईल.

परीक्षेचे स्वरूप

सीमॅट परीक्षा ही साधारणपणे 3 तासांची असणार आहे. ही परीक्षा संगणकावर आधारीत ऑनलाइन स्वरूपाची असणार आहे. त्यामुळे अर्थातच पदवीधर संगणकाच्याबाबतीत साक्षर असावा, ही अपेक्षा आहे. परीक्षेत 100 प्रश्न विचारले जातील, ज्यांना 400 गुण असतील. अभ्यासक्रमात असणाऱया विषयावर 25 प्रश्नांना 100 गुण मिळतील. क्वांटीटेटीव्ह टेक्नीक आणि डाटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रिझनिंग, लँग्वेज कॉम्प्रीहेन्शन, जनरल अवेयरनेस या विषयावर एकूण 400 गुणांचे 100 प्रश्न असतील, हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे. प्रत्येक योग्य उत्तराला 4 गुण मिळतील तर प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कापला जाईल.

तयारी

परीक्षा जानेवारीत होते आहे, ज्यासाठी साधारणपणे अडीच महिन्याचा कालावधी उमेदवारांकडे असणार आहे. अभ्यासक्रमात असणाऱया विषयाची नीट जाण करून घेण्याची महत्त्वाची जबाबदारी उमेदवारांची असणार आहे. त्यामुळे विषयानुरूप आधी सोपा व जड विषय यांची विभागणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार परीक्षेची तयारी करताना वेळ देण्याची गरज असते. प्रत्येक विषय व्यवस्थित आकलन करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. अभ्यासासाठी योग्य ते वेळापत्रक आखण्याची आवश्यकता असते. यासाठी दिवसाचा जास्तीत जास्त वेळ त्यातल्या त्यात पहाटेचा वेळ अधिक कामी येणारा ठरू शकतो. तयारी करताना मात्र आपल्या खाण्या-पिण्याकडेही दुर्लक्षून चालणारं नसतं. या परीक्षेत क्वांटीटेटीव्ह टेक्नीक, डाटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंगसंबंधी प्रश्न विचारले जातात. या विषयावरच अधिक लक्ष पेंद्रीत करायला हरकत नाही. त्यामुळे आतापासूनच या विषयांचा अभ्यास करायला सुरूवात करावी. या विषयांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास सखोलतेने करण्याची गरज असते. गेल्या काही वर्षातील प्रश्नपत्रिका पाहून त्याप्रमाणे वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करणे उचित ठरते.

मॉक टेस्ट

 उमेदवारांना ही परीक्षा संगणकावर द्यायची आहे. म्हणजे अर्थातच उमेदवार संगणक साक्षर असणे हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. म्हणून उमेदवारांनी परीक्षेच्या तयारीसाठी मॉक टेस्टचा सराव करणे खूप चांगले असते. प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा वेग आपल्याला या टेस्टमुळे कळू शकतो. त्यानुसार आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवण्याची तयारी अधिक मजबुत करता येते. कमीत कमी वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव अधिक कामी येऊ शकतो.

 अर्ज कसा कराल- इच्छुक पात्र पदवीधरांना आपला अर्ज सीमॅट-एनटीएच्या संकेतस्थळावर ऑनलाइन दाखल करायचा आहे.

 परीक्षेची तारीख- 28 जानेवारी 2020

 परीक्षेचा निकाल- 7 फेब्रुवारी 2020

 अर्जाची शेवटची तारीख- 30 नोव्हेंबर 2019

 अधिक माहितीसाठी संकेतस्थळ- https://cmat.nta.nic.in

Related posts: